Saturday, February 23, 2008

भाकऱ्या (हास्य विडंबन)

खाना खजाना’वाल्या संजीव कपूरने ‘साँवरीयाँ’ पाहीला .दुसऱ्या दिवशी त्याला ‘भाकरी’ची रेसीपी सांगायची होती.
त्याने ती अशी सांगीतली. . .

थोडंसं पीठ घेऊन ,
त्यांत पा ऽ ऽ णी थोडं टाकून ,
हातावर त्याला वळवून ,
करूया ऽ ऽ गोल - वर्तुळ - चक्राकार ऽ ऽ ऽ
हो ऽ ऽ ऽ भाकऱ्या हा हा हा हा ऽ ऽ ऽ
भाकऱ्या हा हा हा हा ऽ ऽ ऽ
भाकऱ्या हा हा हा हा ऽ ऽ ऽ
भाकऱ्या हो हो हो ऽ ऽ ऽ भाकऱ्या !


पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyaparag.blogspot.com

भेटावा लाँड्रीवाला रे ! (हास्य बिडंबन)

महाराष्ट्रातून बिहारी निघून गेल्यावर सर्वात जास्त परीणाम होणार आहे ती लाँड्रीतून ईस्त्री करून घेणाऱ्यांची. . .हे गाणे एका अश्यांच ग्राहकाकडून आम्हाला ऐकायला मिळाले.

(चाल : ऐसा जादू डाला रे ऽ ऽ )

अस्सा सदरा माझा धुवा रे ,
सदरा हा कोणी माझा धुवा रे !।। ध्रु ।।

मळ जो सगळा काढून टाकील ,
नवीन चमक त्यांवर आणील ,
अस्सा भेटावा लाँड्रीवाला रे !
अस्सा भेटावा लाँड्रीवाला रे ! ॥१॥

गुण मी त्याचे गाईल ऽ ऽ गाईल ऽ ऽ गाईल ऽ ऽ
कपडे जो छान माझे धुवील ऽ ऽ धुवील ऽ ऽ धुवील ऽ ऽ
वेळेशीर जो सेवा देईल,
अस्सा लाभावा लाँड्रीवाला रे !
अस्सा लाभावा लाँड्रीवाला रे !
सदरा कुणी माझा धुवा रे ऽ ऽ ॥२॥

धंदा (हास्य बिडंबन)

निवडणूका जवळ आल्या होत्या .जनतेचं प्रबोधन करण्यासाठी शासनाने ‘मतदारजाग्रुती समिती’ स्थापिली.आता समितीने जनतेचं प्रबोधन
त्यांना उमजेल अश्या माध्यमातून करायचं तरी कसं हा प्रश्न होता .त्यावेळी ‘अंडे का फंडा’ हे गाणं लोकप्रिय होतं .

धंदा धंदा धंदा धंदा धंदा धंदा ,
मतं मागणं हा झालाय धंदा ,
नका बळी पडू मतदारांनो यंदा ,
नाही ऽ ऽ ऽ तर होईल,हा सगळा ऽ ऽ च वांदा ,
सगळा ऽ ऽ च वांदा , वांदा,
सगळा ऽ ऽ च वांदा ॥ध्रु॥

पंचायत असो की,असो ती पालिका,
निवडणूकांमधून सगळ्या ,उमेदवार मागतात भिका ॥१॥

तुम्हीच लक्ष ठेवा ना ,
मत नीट आपले द्या ना,
शासन तुमचे आणा
शासन तुमचे आणा ।।२॥


पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: www.hasyaparag.blogspot.com

वीकली ऑफ( बिडंबन कविता)

आमची ही कविता अश्या एका छोटयाशा जीवाला समर्पित आहे ,ज्याच्याकडे आजपर्यंत फार कमी साहीत्यीकांचं लक्ष गेलं आहे.

चाल: दूध दूध दूध दूध पियो ग्लास फ़ुल दूध !

ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,
गादीखालून निघाला ढेकूण ॥ध्रु॥
पहाटे उठायचे उदया म्हणून ,
झोपायला तुम्ही , लवकर जाता,
पण त्याला नाही माहीत तुमचे शेड्यूल ,
दोघांमुळे होते गादी हाऊसफुल्ल !
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,गादीखालून निघाला ढेकूण ॥१॥

पाहूनी व्यवस्था ठिक एकूण ,
अंग दिले तुम्ही टाकून ,
झोपलेल्या तुम्हाला हा पहातो
पटकन मग चावायला निघतो.
खूप घोर जीवाला लावतो हा ढेकूण !
ढेकूण sss ! ढेकूण sss ! ॥२॥

ढेकूण म्हणतो असेच नेहमी होते,
काळ वेळ काही यांना नसते,
जिथे तिथे असते यांची सुप्रीमसी ,
मिळत नाही मला प्रायव्हसी.
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण
गादीखालून निघाला ढेकूण ! ॥३॥

तुम्ही झोपलायत मजेत बिनघोर,
ढेकूण झालाय खूपच बोअर,
हवंय त्याला काहीतरी अमेझींग,
सुरू करतो मग तो बाईटींग .
त्रास सर्वांना खूप देतो हा ढेकूण !
ढेकूण sss ! ढेकूण sss ! ॥४॥

उठून मग तुम्ही जागे होता ,
काय होते ते ,शोधायला लागता,
कानाकोपऱ्यांत कुठे तरी ,लपलेला असतो हा शोधून कपारी .
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,
गादीखालून निघाला ढेकूण ! ॥५॥

शोधूनी याला आठवडाभर ,
वैतागता तुम्ही खूप अखेर ,
सनडे नाइट ला आरामात पहूडता ,
सकाळपर्यंत चांगलेच घोरता,
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,
गादीखालून निघाला ढेकूण ! ॥६॥

चावला नाही नेहमी सारखा,
म्हणून होतो तुमचा मूड ऑफ ,
तेव्हा हा म्हणत असतो , महाशय बरंका ,
आमचाही असतो एक विकली ऑफ ! ॥७॥



पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: www.hasyaparag.blogspot.com

‘गारवा’ नॉन व्हेज'(हास्य विडंबन)

चाल: ‘गारवा’ या गीतसंग्रहाचे निवेदन.
रविवारी सकाळी पिशवी,
घेऊन बाहेर पड,
गाडी काढू नकोस,
मंथ एंड आहे.
नसेलच पेट्रोल त्यांत,
बाजारांत कोपऱ्यातल्या दुकानाजवळ जा.
पाटी दिसेल तुला-“खुश रहो मटन शॉप”
दुकानात जाऊन ऊभी रहा.
ऊभी रहा उगाच!
बघ! एखादा कोवळा बोकड दिसतोय का?
मग विकत घे मटन.
उरलेले चार रुपये घ्यायला विसरू नकोस.

घरी ये.
त्यांत टाक ते मटन ,
आणि ढवळ,
ढवळत बस उगाच,
बघ! माझी आठवण येत्येय का?
मग चालू कर गॅस ,
बघत बस त्यांकडे ,
कुकरच्या आंतमध्ये शिजत असलेल्या मटनाची संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न कर.
एक स्सस्सस्सस्स स्स्य स्स्य स्स्य!
दोनस्सस्सस्सस्स स्स्य स्स्य स्स्य!
बघ ! तिसरी शिट्टी होत्येय का?
आता कढई घे .
त्यांत मसाला टाक .
तेलही ओत त्यांत,
मग मटन टाक,
भात पोळ्या सॅलड कोशिंबीर केली असशीलच!
आता ताट वाढून घे ,
रिमोट घे टीव्ही लाव.
जगजीत गझल गात असेल,
तू बंद कर.
डिव्हीडीवर आपका सुरूर लाव.
बघ ! माझी आठवण येत्येय का ?
आता जेवायला बस.
भाजीत नेहमीप्रमाणे मीठ नसेलच!
तू ते टाक.

नंतर, ताटात वाढून घेतलेला लांबलचक लेगपीस उचल.
त्यांतलं खाण्यालायक सगळं मटेरिअल संपव.
मग बघ एकटक…
बघ त्या स्वनिर्मीत दुर्बीणीतून,
पलीकडे … आरपार…
बघ काही दिसत्येय का?
बघ काही दिसत्येय का?
बघ काही दिसत्येय का?

पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

ट्रिंग ट्रिंगबोला बोला !(हास्य लघू नाटीका )

(दि दि दरिद्री वाहीनीचा स्टुडीओ. ‘हॅलो दु:खी’ या कार्यक्रमाचा रंगमंच ! )
निवेदीका : “नमस्कार ! दि दि दरिद्री वाहीनीच्या ‘हॅलो दु:खी’ या कार्यक्रमात आपले स्वागत !
अनेक मान्यवर आजपर्यंत इथे येऊन गेले आहेत.आजच्या प्रमुख पाहूण्यांची थोडक्यांत ओळख करून देते .
(दुसऱ्या खुर्चीवर बसलेल्या स्त्रीला…) नमस्कार !”
(लगेच कॅमेरा त्या स्त्री…)
स्त्री: ” नमस्कार !”
निवेदीका : या आहेत सौ.भूमितीबाई समीकरणे .दर्शकहो,आपल्याला नांवावरनंच कळलं असेल की यांचे क्षेत्र ‘गणित ’ या विषयाशी संबंधीत आहे. महाविदयालयांमधून त्या गणित हा विषय शिकवतात. त्यांनी बरीच उपयुक्त पुस्तकं लिहीली आहेत.
पुस्तकांची नावं जरा एकता कपूरच्या सिरियल सारखी वाटतील ती खालीलप्रमाणे:
आर्यभट्ट : शून्याचा शोध ,मग एकाचा,मग दोनाचा ,सहस्त्रकापर्यंत!,
कुठल्याही गणिताविना वीजेचे बील कसे कमी कराल ? : कारणे व उपाय ,
हसता खेळता ,नाचता कुदता मोबाईल वर बोलता बोलता शिका गणित !
२१व्या शतकाच्या उंबरठयावर ,पाणी काढूया लाथ मारून ,गणितीय समीकरणांच्या कंबरडयावर !
एक्केचाळीसातून चाळीस गेले मग उरलेल्या एकाचे काय झाले त्याची कथा !
हं ! तर आपण प्रश्नं विचारायला सुरूवात करूया. आप लेही काही प्रश्नं असल्यास आम्हाला ०९९-९९९९९९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता .इथे एक विनंती करते. कॉईन बॉ़क्स वरनं फोन लागणार नाही .क्रुपया,एस टी डी वरनं प्रयत्न करावा. …. तर भूमितीबाई पहीला प्रश्नं विचारते.आपल्या नावानंच सुरुवात करु.आपलं ‘ भूमिती’ हे नाव कसं पडलं ? ”
भूमितीबाई: “त्याचं असं झालं की म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मी लहान असतांना पाळण्यांत खूप रडायचे ,असं आई- बाबा सांगतात .त्यामुळे ते मला जमीनीवरंच ठेवत .तिथेही मी सरळ अशी कधी झोपलेच नाही .तर वेगवेगळ्या कोनांमध्ये मी झोपायचे .ते कोन म्हणजे निरनिराळ्या भौमितीक रचना होत म्हणुन माझं नाव ‘भूमिती’ ठेवलं गेलं. ”
निवेदीका : “ओहो !फारच मनोरंजक आहे ही तुमच्या नावाची कहाणी !”
(टेलीफोनची घंटी वाजते.. ट्रिंग ट्रिंग!)
निवेदीका : “आपला पहीला फोन वाटतं !”
(फोनवर): “ हॅलो दु:खी ! बोला ! हां ! हां! बोला !
फोनवरून पलीकडचा माणूस: “ आरं ये गणप्या ! हायेस कुठे ल्येका तू ? इक्डं म्हशीचा शेण साफ करायचाय ,चारा घालायचाय ! कुठे हाय तू ?”
निवेदीका :”अहो तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोन केलात !रॉंग नंबर!”
पलीकडचा माणूस: :“ओ बाई ! गणप्याला पाठवा आमच्या , अन आम्हाला काही रांगेत नंबर नै लावायचा .
हा म्हादबा बोलू राहयलो.”
निवेदीका : “मी फोन ठेवत्येय , क्षमस्व!”
(फोन ठेवते)
निवेदीका :”दर्शकहो माफ करा .नावाप्रमाणं आमची वाहीनीही दरिद्री असल्यानं असे फोन येतात. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळू या .तर भूमितीबाई मला सांगा की … गणिताची आवड आपल्याला कशी निर्माण झाली?”
( सौ.समीकरणे मूव्हींग चेअरवरून हातांची बोटं एकमेकांत गुंतवून ० ते १२० अंशांमध्ये डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे अशा फिरत्या अवस्थेत.. )
सौ.समीकरणे : “फार चांगला प्रश्न विचारलात !”
निवेदीका :“ हो पण उत्तर द्य़ा आता लवकर !”
सौ.समीकरणे : “त्याचं काय झालं की मी पाचवीत असतांनाची गोष्टं. . . दूधवाला आमचा ! वेळेवर येईना ! सुट्ट्या मारायला लागला. कधी कधी दूध पातळ असायचे .मी कालनिर्णयावर या सर्वांची नोंद करीत असे.तेव्हापासूनच गणित हा विषय माझा आवडता झाला.”
निवेदीका : “म्हणजे एखादे दिवशी तो नाही आला की त्या तारखेला तुम्ही क्रॉस करून ठेवत असणार .बरोबर ना ?”
सौ.समीकरणे : “चूक !तसं बिलकुल नाहीये .काय होत होतं की माझे वडील गिरणी कामगार .त्यांना कही तरी स्टिम्युलंट हवंच असायचं.अन चहा नाही मिळाला तर बिडया ओढायचे भसा -भसा.आमचं चाळीतलं एका खोलीचं घर मग काही दिसायचं नाही .मग मी क्रॉस करून ठेवायचे ‘आज अभ्यास झाला नाही म्हणून ..” .
निवेदीका : “वावा ,खरंच ! किती हो तुम्ही हुशार ! (तेवढयांत फोन वाजला.) हं आपला दूसरा फोन वाटतं .नाशिकहून श्री.कडमडकर बोलतायत .हां ,हॅलो दु:खी ! बोला.”
फोनवरून पलीकडचा माणूस: “ हलू.”
निवेदीका :“हां .बोला .आपला काय प्रश्न आहे ? ”
पुन्हा ,पलीकडचा माणूस: “ हलू ”
निवेदीका : “ अहो,इथून न हलण्याचेच पैसे निर्माताआम्हाला देत असतो.तुम्ही नि:संकोच विचारा.मी अजीबात हलणार नाही. श्री.कडमडकर लवकर कडमडा … आपलं बोला .मला कार्यक्रम पुढे रेटायचाय ..आमच्या वाहीनीचा टी.आर.पी.वाढवायचाय !”
(फोनवरून ) पलीकडचा: मला सांगा ,वीजेच्या बीलावरचं पुस्तक तुम्ही कसं लिहीलं ?”
सौ.समीकरणे : “कसं म्हणजे ? हातानं लिहीलं.
(फोनवरून ) पलीकडचा: “तसं नाही हो पण कसं लिहीलं ?”
सौ.समीकरणे : “शाईचा वापर करून कागदावर लिहीलं .”
(फोनवरून ) पलीकडचा: “ही बाई माझं बील वाढवणार फोनचं …अहो..मला असं विचारायचं होतं की सुचलं कसं तुम्हाला ?
(मग सौ.समीकरणेंच्या डोक्यात प्रकाश पडला .)
सौ.समीकरणे : “अच्छा ! माझ्या कुठल्याही गणिताविना वीजेचे बील कसे कमी कराल ? :कारणे वं उपाय या पुस्त्काबद्दल आपण बोलताय तर ! त्यानं काय झालं ना की. . .”
(फोनवरून)) पलीकडचा: “ कोणाचं ? ”
सौ.समीकरणे : “ सांगत्ये हो .मध्येच डिस्टर्ब नका करू बरं . . आमचं कॉन्सनट्रेशन जातं. …हं तर काय सांगत होत्ये मी ?
आमच्या चाळीत येणारा मीटर रिडींग वाला एकदा दिवाळी जास्त मागत होता.आम्ही पाळत ठेवली त्याच्यावर आणि एकदा मीटर मध्ये तार टाकतांना त्याचा फोटो काढला .तेव्हापासून सांगते दिवाळी मागणं तर सोडाच पण चाळीत कोणाची लाईट सुद्धा गेली नाही.असे बरेच उपाय दिले आहेत त्या पुस्तकात .त्यांत . . .”
निवेदीका : “ ठिके ,ठिके .तुमची जाहीरात नको कारण आम्हाला दुसऱ्या जाहीरातीही दाखवायच्या आहेत.
मंडळी … चॅनेल अजिबात बदलू नका .घेऊया एक व्यावसायीक विश्रांती.”
(ब्रेक मध्ये असंख्य जाहीराती… एक मुलगी विशिष्टं असं मीठ खाल्ल्याने कलेक्टर कशी बनते ,शाळेत जात असलेले भाऊ बहीण दाग अच्छे हैं म्हणत आपले शुभ्र कपडे चिखलाचे कसे करून घेतात , विशिष्टअसं मीठ खाल्ल्यानं सैफ अली खान थेट समुद्रात कसा जातो,साबणाच्या खरेदीतून पन्नास पन्नास पैसे वाचवून एक ग्रुहीणी काळजीने भाऊ पोहोचेल नं वगैरे म्हणून माहेरी मनीऑर्डर अशी पाठवते वगैरे जाहीराती संपल्यानंतर..)
निवेदीका : ‘ हॅलो दु:खी’ मध्ये पुन्हा आपलं स्वागत ! तर भूमितीबाई आपल्या पुस्तकात अजून कुठल्या कुठल्या समस्यांचे उपाय आहेत.? ”
सौ.समीकरणे : “ त्यांतील एका प्रकरणात मी मोबाईलचं बील कसं कमी करता येईल याबद्दल लिहीलंय.”
निवेदीका : “अच्छा म्हणजे सर्वात कमी दर असलेल्या कंपनीची सेवा घ्यायची असंच ना ?”
सौ.समीकरणे : “नाही हो ,ती तर घ्यायचीच पण तुमचे कॉल जर तुम्हाला वाचवायचे असतील तर समोरच्याला एक मिस कॉल द्यायचा .सो सिंपल ! आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगते ..आज जे लोक ही युक्ती वापरतायत त्यांनी ती माझ्याच पुस्तकातून वाचली आहे. या युक्तीचं पेटंट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय …..अजून एका प्रकरणात चपला कश्या कमी झीजतील याबद्दल मी लिहीलंय.”
निवेदीका :“कश्या कमी झीजतील हो चपला ?आमच्या दर्शकांनाही सांगा. . .
म्हणजे दोन दोन पायऱ्या सोडून चालायचे की काय ?”
सौ.समीकरणे : “चपला कमी झीजण्यासाठी तुमचा वरच्या मजल्यावर असलेला फ्लॅट तुम्ही भाडयाने द्यायचा आणि जिथे जिना नाही अशा तळमजल्याच्या घरात राहायचे.सो सिंपल ! अश्या बऱ्याच टिप्स तुम्हाला माझ्या पुस्तकातून मिळतील.”
निवेदीका :“आपला पुढचा फोन येतोय . . . , हॅलो दु:खी ! बोला.”
(फोन वरून:): ”नमस्ते ! मला आपल्याला विचारायचं आहे की आपल्या प्रकाशित होणऱ्या पुढच्या पुस्तकाचे नांव काय आणि ते कुठून प्रकाशीत होईल ? ”
सौ.समीकरणे : “ माझ्या आगामी पुस्तकाचं नांव आहे ‘गणितीय पद्धतीने ग्रुहव्यवस्थापन’ .ते पुण्याहून ड्रॅगन प्रकाशना कडून प्रकाशीत होईल. माझे वाचक माझ्या पुस्तकाची एवढी वाट पहातात ,याबद्दल मी स्वत:चं भाग्यच समजते. ”
(फोन वरून:) : “तसं नाहीये मॅडम ! दुर्भाग्य तर आमचंय की तुमची पुस्तकं आम्हाला वाचावी लागतात. ‘ गणितीय स्वयंपाक पद्धती’ हे तुमचं लिहीलेलं पुस्तक जेव्हा माझ्या बायकोने वाचलं तेव्हापासून ईतक्या वेगवेगळ्या चवीचे अन विचित्र वासाचे पदार्थ मला खावे लागतायेत की काय सांगू . वैतागलोय मी ! म्हणूनच . . . जिथे तुमचं पुस्तक छापायला द्याल, त्या छापखान्यालाच मी आग लावून देणार आहे ,म्हणजे ते पुस्तक कोणी वाचूच शकणार नाही. ”
(फोन बंद होतो.)
सौ.समीकरणे :“अरे बापरे !या गणितामुळे माझ्या आयुष्यात ‘ = ’च्या चिन्हापुढे ‘०’ यायची वेळ आलीय. यानंतर मी कार्यक्रमात थांबू शकत नाही. . . मी आता कटते ..सॉरी . . मी आपल्यापासून रजा घेते .क्षमस्व , येते मी. ”
निवेदीका : “या आपण ,पण जातांना पॉकेट माइक देऊन जा .नाहीतर निर्माते आमच्याकडनं वसूल करतील त्याचे पैसे . . .दर्शकहो .. या होत्या या सप्ताहाच्या मान्यवर . आपण अजून एका व्यक्तीला इथून दु:खी करून पाठवलं आहे. ”
पुढच्या आठवडयांत पहायला विसरू नका .याच ठिकाणी ….याच वेळी… आपला आवडता हा कार्यक्रम. . ‘हॅलो दु:खी’.
धन्यवाद !


पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

हिमेशच्या गाण्य़ाचा जन्म !

तेव्हा हिमेश तितका प्रसिद्ध नव्हता.बेकारच असायचा बिचारा.व्हायोलीन घेऊन रोज बोरीवली ते चर्चगेट प्रवास करायचा.आप का सुरूर हा त्याचा अल्बम प्रसिद्ध होण्याआधीची ही गोष्ट .
कंडक्टर होता बेरकी.तिकिटाचे पैसे दिल्यावर त्याला कंडक्टरनं त्याच्या बोकडदाढीमुळे कधीही एक रूपया परत दिला नाही . तिकीट होतं नऊ रुपये. पण हा दयायचा दहा .तिकीट असायचं नऊ .
हे हिमेश किती वेळ सहन करणार होता ? शेवटी त्याने आपल्यावरील झालेल्या अन्यायाला गाण्यातून वाचा फोडायचे ठरवले.

हिमेश म्हणाला :
ए ऽ ऽ ऽ कंडक्टर ऽ ऽ ऽ
रूपया माझा ऽ ऽ ऽ परत कर ऽ ऽ ऽ ।।ध्रु ।।
रोजंच या वेळी,मी बसमध्ये बसतो ,
रोजंच रूपया ,माझा तू हडपतॊ.
रोजंचा एक म्हटल्या ऽ ऽ वर रूपये तीस ऽ ऽ ऽ ,
रूपये तीस ऽ ऽ ऽ ,
एका महीन्याचे होतात.
ए ऽ ऽ ऽ कंडक्टर ऽ ऽ ऽ चोरी ही अशी बंद कर ऽ ऽ ऽ ॥१॥
लाज नाही वाटंत,
चोरी करतोस,
वरतून फिरतोस,
सरकारी गाडीतून रोज ऽ ऽ ऽ ॥ २॥
मला द्यावासा वाटतो आहे तुला काठीचा प्रसाद ऽ ऽ ऽ ,
काठीचा प्रसाद ऽ ऽ ऽ
काठीचा प्रसाद ऽ ऽ ऽ ।।३॥

आता कोणाला खरंही वाटणार नाही पण हेच गाणं आप का सुरूर मध्ये शब्द बदलून घेतलं गेलं .
पराग खैरनार ,नासिक

paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

ओम शांती ऒम (हास्य विडंबन)

एका मासेवाल्याने ‘ओम शांती ऒम’ पाहीला .दूसऱ्यादिवशी त्यातली गाणी त्याला मासे विकतांना आठवायला लागली.
(चाल: आँखो मे तेरी . . .)

टोपलीमध्ये माझ्या ..
वेगवेगळी ही मासळी आहेत ।।ध्रु ।।

हो ऽ ऽ हो ऽ ऽ टोपलीमध्ये माझ्या . . .
वेगवेगळी ही मासळी आहेत
कोळंबी ,बांगडा ,पापलेट ,सुरमई, आणि हा ऽ ऽ ऽ ऽ बोंबील आहे !
टोपलीमध्ये माझ्या ..॥१॥

(लोक गाण्यामुळे मासे घ्यायला वळले पण भावात घासाघीस करू लागले तसा मासेवाला म्हणाला…)

किती सांगू तुम्हाला की घ्या . . . पण भाव करूही नका ,
माल माझा आहे … नुकताच जहाजातून उतरवलेला ऽ ऽ ताजा !
टोपलीमध्ये माझ्या ..॥२॥

तसा बाव आहे २०० रूपये एका किलोला ऽ ऽ,
पण चल जाऊ दे ,तुला १८० ने दिला . . .
टोपलीमध्ये माझ्या ..॥३॥


पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/








प्रेमपत्र असेही !(भाग :द्वितीय)

अमावस्येच्या आधीची ती अंधारलेली रात्र .रातकिडयांचा तो धीर गंभीर आवाज .रिटायर्ड पेन्शनराच्या खुर्चीसारखी
दारा खिडक्यांच्या तावदानांची खडखड. अश्यांत अचानक कुठुनसे एक वटवाघूळ टग्या भाऊंच्या घरात आले अन उश्याशी पत्र ठेवून उडून गेले. ‘कुणाचे हे पत्र?’ म्हणून टग्याभाऊंनी आपला जाड भिंगाचा चष्मा सरसावला अन पत्र वाचायला घेतले.

“ हे प्राणप्रिया प्राणेश्वरा !
तुझे पत्र मिळाले. आणि तुझ्या कौतुकरूपी स्तुती सुमनांच्या बाथ टब मधल्या मंद धुंद वर्षावानं मी बह्रून गेल्ये.
तुझे ते राजबिंडे रूप मला (?) स्मरले अन सख्या हे पत्र मी लिहायला घेतले.

हे प्राणसख्या ,
आठवतोस मला तू जिन्स अन टि-शर्ट मधला,

किती रे सुंदर तुझे हे रूपडे ,
कपाटातल्या हॅंगरलाच जणू टांगलेत कपडे ! ॥१॥

जगा या दिसतो प्रथम दर्शनी , तुझ्या काळ्याभोर केसांचा ‘ शाहीद’ स्टाईल केशसंभार ,
पण फक्त मलाच आहे माहीत लाभलाय त्यांस ‘डाबर केशकाला’चाच हातभार ॥२॥

भिंगाचा चष्मा का असेना तुला ,
द्रुष्टी आहे तुझी अतीव सुंदर ,
मी मात्र कोडयांत पडते ,
कसं गडया पाहू शकतोस तू एकाच वेळी उर्ध्व आणि अधर ! ॥३॥

किती रे राजा हात तुझे बारीक ,
सहारच्या वाळवंटात जणू कोणी वाळवलीय खारीक ! ।।४॥

कळेना मला का फिरायचास माझ्याभोवती ,जसा बत्ताशाला लागतो मुंगळा ,
अरे मेल्या ! तू तर दिसतोस … प्रयोगशाळेतला हाडांचा सापळा ! ॥५॥

आवाज रे तुझा अगदी इंटरेस्टींग ,
ऎकतांना वाटे … फिट करतांनाच साऊंड तुझ्यात,
विधात्याकडनं त्या, तुटली होती का रे स्प्रिंग ?॥‍६॥

आठवते का सख्या तुला ?
रूप पाहून तुझे असे हे डॅशींग ,
(भूत की काय म्हणून)
धाकावली होती म्हैस आमची ,
मारले होते तिने शिंग ! ।।७॥

सदरे रे तुझे ते किती असतात मळके ,
धड दात नाही की नाही पुरेसा क्लीअरंस कवळीला ,
तोंडाचे या झाल्येय की रे बोळके ! ॥८॥

येताच तू येई तो मंद सा अजब वास ,
विचारावेसे बऱ्याचदा वाटले मला,
सगळ्या डिऒड्रंट बनवणाऱ्यांनी अन विकणाऱ्यांनी घेतलाय की काय रे गळफास ? ॥९॥

माझ्यावरच्या प्रेमामुळे म्हणतोस ,
देह झालाय जर्जर ,
पण मला आठवतो आपला संसार ,
मी नवी कोरी सायकल अन तू टायर पंक्चर ! ॥१०॥
बोलणे रे ,तुझे किती होते फाकडे ,
भिती वाटे ,गडया मला ,कुणी फूंकर मारली तर ,उडून पडशील कुणीकडे ! ॥११॥

वाचूनी तुझा शब्द न शब्द ,रडले रे मी ढसा ढसा ,
कोमलह्रुदयी या पुष्पाला दुखवुनी , तू ‘बापडा’ कसा ? ॥१२॥

पण असा जरी असलास ना सख्या तू ,
तरी आहेस मला प्रिय,
देवाघरी जातांना काय ईच्छीले मी ,
तुला ठाऊक आहे काय ? ॥१३॥

“ देवा ! पुढल्या जन्मी ‘वडापाव’ च्या दिवशी ,
माझ्याकडनं पाच ऐवजी दहा आंबे घे ,
पण ह्येच ब्येणं मला ( बदला घेण्यासाठी ) ,
पुढल्या जन्मीही लाभू दे ! ॥१४॥

तुझीच आहे सख्या ,मला रे चिंता ,
अन अजब ही हूरहूर माझ्या मनी …,
वाट पाहात्ये अमावस्येची ,कधी रे येशील भूतयोनीत ? ॥१५॥

या जगांत नसूनही केवळ तुझीच असलेली ,
टवळी.



(पराग खैरनार,नाशिक )
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/
तुझे ते राजबिंडे रुप मला (?) स्मरले अन सख्या ,हे पत्र मी लिहायला घेतले.

’तृप्ती’(हास्य विडंबन)

एक पती दिवस भराच्या श्रमानंतर थकून आला .त्याला खुप भूक लागलेली होती.आधी श्रावण नंतर पितृपक्ष असे जवळजवळ दोन महिने त्याला नॉन व्हेज मिळाले नव्हते.पत्नि टि.व्हीवर शाहरुखचा सिनेमा पहात होती.त्याने आपल्या भावना गाण्यांत व्यक्त केल्या.

(चाल: बाजीगर ओ बाजीगर )

तो: भाजी कर गं भाजी कर ss
मटनाची आज भाजी कर ॥ धॄ ॥
हो ss किती झालेत दिवस ,
आता सांग थांबू कसं ?
आता बस झाला हा शाकाहार ss !
भाजी कर गं भाजी कर , मटनाची आज भाजी कर ॥ १ ॥
पालक , बटाटा अन मेथी,
शेपू ,वाटाणा अन चवळी,
खाऊन रोज रोज तेच ,
चव तोंडाची गेलीय सगळी ॥२॥
ती: आले माझ्या ध्यानात ,
आत्ताच जा तुम्ही बाजारात,
आणा मटन चांगले तीन शेर,
तो: भाजी कर गं भाजी कर ,
मटनाची आज भाजी कर ॥ ३ ॥
(तेवढ यांत तिच्या लक्षात आले की किराणा संपलेला आहे.)
ती: नाही खोबरं ,तेजपानं ss,
मसाला ही आज संपलायनं ,
लोडशेडींग मुळे घोळ ss,
बेत झालाय अवघड
तो: होss .तसाच मॉलमध्ये जातो
तयार मसाला आणतो
मग तर तू पावसील की नाही ss?
स्वयंपाक कर्शील की नाही ?
ती:आत्ता बोललास तसा तू जर वागणार
तयार मसाला मला मिळणार
तर छान भाजी मी बनवणार

आत्ता जारे तू झटपट ,
मसाला आणून दे पटपट !

प्रेमपत्र असेही (भाग :प्रथम)

प्रिय टवळी हिस,
तुझ्याप्रती जे वाटतंय ते शब्दांत कसं सांगू ,प्रयत्न करतो.

प्रिये,
केस तुझे कुरळे कुरळे ,
फिरती त्यांवर किती गं झुरळे ! ॥१॥
नाक तुझे गं वर्णू मी काय ,
ई ss म्हशीने त्यावर जसा दिला गं पाय ! ॥२॥
गाल तुझे हे गोबरे गोबरे ,
जसे गं काळ्या पाठीचे खोबरे ! ॥३॥
चंचल बहू असे तुझ्या तिरछ्या नजरेचा गं झोका ,
at a time चुकतो त्यामुळे दोघा (!) बघ्यांच्या ह्रुदयाचा गं ठोका ।।४॥
भारदस्त बहू असे प्रिये गं तुझे वजन ,
मला तर बुवा स्मरे टाकी गॅसची एसो अथवा बर्सन॥५॥
असता तू निकट माझ्या थरथरत माझे ओठ ,
प्रक्षोभक अन भडक तेवढीच होतो की काय आत्ताच स्फोट ? ॥‍६॥
ईच्छा नाहीये माझी तुझे पाय बघण्याची ,
सवय वाटतं नाहीये तुला आंघोळ करण्याची ।।७॥
आगमनाने तुझ्या होई शिरकाव मंद त्या चमत्कारीक गंधाचा ,
आता किती गं घेशील जीव गजऱ्यांतल्या त्या कोमेजलेल्या फुलांचा ॥८॥
आवाज तुझा किती गं किनरा ,
तुटलेल्यांपैकी एकच उरलीये तार अन तरीही जसा वाजवला जातोय तानपुरा ! ॥९॥
अदा या तुझ्या हास्याच्या अश्या एकाहूनी एक सरस ,
वाटे ,दूर जंगलात कुठेतरी ,विव्हळू लागलाय जसा गं तरस ! ॥१०॥
तू बहूगुणसंपन्न अन आहेस सुस्वरूपी ,
फोटो तुझा असा येई जशी बघतोय कार्बन कॉपी ॥११॥
पाहूनी अदा तुझ्या निरनिराळ्या ,
आठवतात मला मॉडेल्स केनीयन ,आफ्रिकन ,कभिन्न ,काळ्या ! ॥१२॥
चाल तुझी गं अशी नशीली ,
वाटे स्मशान सोडून हडळ ईकडे कुठे बरं ही आली ? ॥१३॥

तुझ्या प्रेमात जर्जर झालेल्या या पामराची ही अखेरची ईच्छा:
अखेरची ईच्छा आहे माझी तुझ्याच साठी,
चंद्रावर ताजमहाल बांधण्याची ,
प्लॉट तर घेऊन ठेवलाय केव्हाच,
वाट गं पहातोय केवळ तुझ्या गचकण्याची! ॥१४॥

त्तुझ्यामुळे (तू गळ्यांत बांधली गेली असल्याने )इतर कुणाचाही न होवू शकलेला
त्यामुळे फक्त तुझाच ,
टग्या.



पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

मनातल्या मनांत !

ऎश्वर्या - अभिषेक च्या लग्नाचा सर्व फिल्मी पाहुण्यांनी आनंद लुटला .
त्यांच्या मनातले विचार आम्हाला आमच्या माइंड रिडर या यंत्रामुळे कळाले.

ऎश्वर्या: तपश्चर्या माझी आज आली फळाला,
मंगळ असून ही कुंडलीत , अभि लागला गं बाई गळाला !

सलमान : शायनींगमध्ये तुझ्या बरोबर ,मी केला ’हम दिल दे चुके सनम ’
पण पदरी आली तनहाई ,जेव्हा करायला गेलो तुला बेगम !

अभिषेक : बीग बी चा स्मार्ट मुलगा ,आज हिट ठरला ,
’ Ash’शी बांधून लग्नं बंधन ,सलमानचा बरोब्बर पत्ता काटला .

ना प्रिती,ना प्रियंका,ना राणी ,ना दिया,
the whole thing is that के भैया सबसे बडा रूपैया

(तिथे रेखा ही होती,सगळा लग्नाचा माहोल पाहून तिला आपले जुने दिवस आठवले )
रेखा : कुणी चांदी घ्या गं, कुणी सोनं ही घ्या,
मला बाई बदल्यांत माझा अमीत गं द्या.

हेमामालीनी: ’धूम’ अन ’दस’ मध्ये बरोबर असूनही ,
जमलं नै आमच्या ईशाला काही,
हिनं (Ash नं)मेलीनं काय केलं गारूड जाणे ,
होत्येय माझी लाही लाही .

(अमरसिंगही जातीनं हजर होते.)
अमरसिंग : कोणी आपल्याला काही म्हणावे ,घेऊ एकेकाची खबर ,
अमितजींना कोणत्याही संकटातून सांभाळायला ,
मातब्बर आहे हा त्यांचा गॉडफ़ादर !

(एवढ्यांत ऎशच्या मनांत पुन्हा काही तरी आलं .)
ऎश: किती सांगू मी सांगू कुणाला SS,
किती कुतबे करून अभी हा मिळाला SS. (कुतबे = बरे -वाईट श्रम)

अमिताभ :मुलगा अभिनयांत कसाही असला ,
तरी मी त्याचा बाप डोकं लढवितो,
पिक्चर नाही चालले तर काय झालं ,
लग्नं शूट करून पैसे कमवितो .

जया: हे काली माते ! नव्या बहूच्या रूपानं आमच्या घरात लक्ष्मी येऊ दे .
दोन चार तरी फ़िल्मे, माझ्या अभीच्या नावानं लगोलग हिट होऊन जाऊ दे.

(पत्रकारांना अमितजींनी शेवटपर्यंत काही आंत येऊ दिलं नाही.)
पत्रकार: अमितजी , अहो उद्या वाटल्यांस सगळे awards अभिला मिळाले असं खोटंच छापून घ्या,
पण आजच्या दिवशी मात्र कृपा करून ,आत येवून , थोडे फ़ोटो काढू द्या.

निर्माते: सरकार ,बंटी - बबली मुळे केली बाप-बेटयांची भरपूर लोकप्रियता एनकॅश,
आत्ता तर मिळाली फ़्री मध्ये बायको अभीची , ही विश्वसुंदरी Ash !

दिग्दर्शक: सगळे सुटलेत या जोडी मागे ,आम्हा काही सुचेना ,
करावा तयार एखादा मेगा शो ,घेऊन ही राघू-मैना !

(याप्रसंगी समिक्षकांना रसगुल्ले दिले गेले.म्हणून ते खुश होते.)
समिक्षक: पो-या जरी करतो कधीकधी बापाची सेम टू सेम कॉपी ,
चांगलं होतंय ना अभी - ऎशचं मग आम्ही वेरी वेरी हॅप्पी!

(बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची खूप धांदल उडाली.)
पोलिस : कोणाचं लग्नं अन कोणाचं डोहाळजेवण, कुठे मारामारी अन कुठे कापाकापी,
ऎन समारंभात नशीबी येई दरबानासारखं दारात उभं रहाणं ,कुठे पडलॊ कमी तर होते गळचेपी !

(इथे भूतांनीही हजेरी लावली होती).
परवीन बाबीचे भूत:सर्वात आधी मी अमितला पटवला ,
नंतर कसा कोण जाणे जयानं त्याला गटवला ,
संतापाच्या अतिरेकानं वेड लागून जीव मी गमावला,
बदला असा घेईन की कमी पडेल भुई ही पळायला !

(तिथे अनेक सिने तारका हजर होत्या)
बिपाशा:सब की बाराते आई ,डोली तू भी लाना,दुल्हन बनाके हमको जॉनजी ले जाना .

( याप्रसंगी सैफ़ - करीना एका बाजूला अन शाहीद दुसऱ्या बाजूला असे बघण्यांत आले.)
करीना: देखा जबसे सैफ़को , बस देखा सैफ़को यारा,
सैफ़से कोई अच्छा है , ना सैफ़ से कोई प्यारा,
यू नजरे ना फ़ेरो तुम मेरे हो सैफ़ तुम,
कह दिया ,कह दिया , यू आर माय सोनिया.

शाहीद:आधीच झाली होती हिच्यामुळे माझी खुप बदनामी,
कुठून पाठवली त्यांत उपरवाल्यानं ,सैफ़ नावची त्सुनामी.

(शाहीदची अवस्था पाहून सैफ़ला आतून उकळ्या फ़ुटत होत्या.)
सैफ़: लोकंहो ! सांभाळा ! मी आहे दुसऱ्यांच्या गर्लफ़्रेंड पळ्वणारा, मी आहे आशीक, आशीक आवारा !

(शाहरुखनं या महोत्सवापासून दूर राहणं पसंत केलं)
शाहरुख: या अल्लाह ! रहम करना ! या बिग बी चे सगळे हिट चित्रपट ,मुझे फ़िरसे करने का मौक देना.

(तिथे श्रीदेवीही आली होती.)
श्रीदेवी:चालेनात पिक्चर माझे अनिलबरोबर,शेवटी खुप खाल्ल्या खस्ता,
केलं लग्नं शेवटी बोनीशी,हाच होता आखरी रास्ता.

अनिल: ए भाईलोग सुनॊ ! श्रीदेवीला फ़सवलं नाही मी,तिचा आहे आपल्यावर विश्वास ,
आपल्या पोरीनेपण एंट्री मारली’ सांवरीया’तून,लाईफ़ चाललीय झकास !

(खासदार जयाप्रदा ही तिथे होत्या)
जयाप्रदा:हमको ईथना तो कुछ हिंदी नै आता ,लेकीन हम ईथना कैता,
शुक्रियादा कर्ताय इंडीयन पब्लिक का ,जो हम जैसा कलाकार को चुनाव में जिताता !

ऋतिक:कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात मी,आपण बरं की आपलं काम बरं,
लवकरच येतोय माझा Ash बरोबर ,जोधा आणि अकबर !

( ’क’ मालीकांची निर्माती एकता ही तिथे होती)
एकता:सुरूवात झाली अमितजींच्या KBC मुळे,माझा गल्ला भरायला बरंका !
प्रक्षेपणात लग्नाच्या या ,वेळ मिळवून ,दाखवू का ’क’ची एखादी मालीका ?

(सगळे आले ,मग मी का नको म्हणून सानियाही तिथे आली होती.)
सानिया:चार डाव खेळू बाई,तेव्हा एखादा तरी जिंकावा,
अभीसारखा मलाही पाठव , इंश अलाह ,एक रापचीक छावा !
(अशाप्रकारे हे लग्नं संपन्न झाले)





पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

साक्षात्कार (हास्य विडंबन)

ही गोष्ट आहे त्या वासराची ज्याच्या कपाळावर जन्मत: टिळा असल्याने त्याला देवाचा अंश शरीरात असलेला असे समजलं गेलं .त्यामुळे त्याच्या खांद्यावर नांगराचे ओझे टाकले गेले नाही.

(चाल:ये काली काली आँखे )

हा आमचा दगडू गवळी ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
ही त्याची ढवळी गाय ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
ही तिचे शुभ्र वासरू ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
त्याचे ते करडे पाय ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
दुडक्या चालीने धाव ऽ ऽ त ते आई मागे जा ऽ ऽ ऽ य ! ।। ध्रु ।।

गाय व्याली ,
तिला वासरू झालं ,
देऊ सर्वांना पेढे,
गोठ्यामध्ये जाऊ ,
वासराला पाहू,
म्हणून झाले सारे वेडे . . .हा ! ।। १ ।।

गोठ्यामध्ये ऽ ऽ,
पाहीले त्यांनी,
वासराला ऽ ऽ आणखी निरखून ऽ ऽ ,
मग दिसला ,
त्यांना टिळा ,
जो होता त्याला ऽ ऽ जन्मापासून ऽ ऽ ऽ ।। २ ।।

अरे ,हा तर चमत्कार !
आहे हा दैवी अवतार ,
आहे हा ऽ ‍ऽ दैवी ऽ ऽ अवतार ।। ३ ।।

वासराचा नंदी केला , तुरूरू ,तुरूरू,
त्याला त्यांनी देव बनवला,
एकतरी जीव आ ऽ ऽ ता फटक्यांपासून वाचला ।। ४ ।।

पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/