Saturday, February 23, 2008

प्रेमपत्र असेही (भाग :प्रथम)

प्रिय टवळी हिस,
तुझ्याप्रती जे वाटतंय ते शब्दांत कसं सांगू ,प्रयत्न करतो.

प्रिये,
केस तुझे कुरळे कुरळे ,
फिरती त्यांवर किती गं झुरळे ! ॥१॥
नाक तुझे गं वर्णू मी काय ,
ई ss म्हशीने त्यावर जसा दिला गं पाय ! ॥२॥
गाल तुझे हे गोबरे गोबरे ,
जसे गं काळ्या पाठीचे खोबरे ! ॥३॥
चंचल बहू असे तुझ्या तिरछ्या नजरेचा गं झोका ,
at a time चुकतो त्यामुळे दोघा (!) बघ्यांच्या ह्रुदयाचा गं ठोका ।।४॥
भारदस्त बहू असे प्रिये गं तुझे वजन ,
मला तर बुवा स्मरे टाकी गॅसची एसो अथवा बर्सन॥५॥
असता तू निकट माझ्या थरथरत माझे ओठ ,
प्रक्षोभक अन भडक तेवढीच होतो की काय आत्ताच स्फोट ? ॥‍६॥
ईच्छा नाहीये माझी तुझे पाय बघण्याची ,
सवय वाटतं नाहीये तुला आंघोळ करण्याची ।।७॥
आगमनाने तुझ्या होई शिरकाव मंद त्या चमत्कारीक गंधाचा ,
आता किती गं घेशील जीव गजऱ्यांतल्या त्या कोमेजलेल्या फुलांचा ॥८॥
आवाज तुझा किती गं किनरा ,
तुटलेल्यांपैकी एकच उरलीये तार अन तरीही जसा वाजवला जातोय तानपुरा ! ॥९॥
अदा या तुझ्या हास्याच्या अश्या एकाहूनी एक सरस ,
वाटे ,दूर जंगलात कुठेतरी ,विव्हळू लागलाय जसा गं तरस ! ॥१०॥
तू बहूगुणसंपन्न अन आहेस सुस्वरूपी ,
फोटो तुझा असा येई जशी बघतोय कार्बन कॉपी ॥११॥
पाहूनी अदा तुझ्या निरनिराळ्या ,
आठवतात मला मॉडेल्स केनीयन ,आफ्रिकन ,कभिन्न ,काळ्या ! ॥१२॥
चाल तुझी गं अशी नशीली ,
वाटे स्मशान सोडून हडळ ईकडे कुठे बरं ही आली ? ॥१३॥

तुझ्या प्रेमात जर्जर झालेल्या या पामराची ही अखेरची ईच्छा:
अखेरची ईच्छा आहे माझी तुझ्याच साठी,
चंद्रावर ताजमहाल बांधण्याची ,
प्लॉट तर घेऊन ठेवलाय केव्हाच,
वाट गं पहातोय केवळ तुझ्या गचकण्याची! ॥१४॥

त्तुझ्यामुळे (तू गळ्यांत बांधली गेली असल्याने )इतर कुणाचाही न होवू शकलेला
त्यामुळे फक्त तुझाच ,
टग्या.



पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

No comments: