Saturday, February 23, 2008

साक्षात्कार (हास्य विडंबन)

ही गोष्ट आहे त्या वासराची ज्याच्या कपाळावर जन्मत: टिळा असल्याने त्याला देवाचा अंश शरीरात असलेला असे समजलं गेलं .त्यामुळे त्याच्या खांद्यावर नांगराचे ओझे टाकले गेले नाही.

(चाल:ये काली काली आँखे )

हा आमचा दगडू गवळी ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
ही त्याची ढवळी गाय ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
ही तिचे शुभ्र वासरू ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
त्याचे ते करडे पाय ऽ ऽ , तुरूरू ,तुरूरू,
दुडक्या चालीने धाव ऽ ऽ त ते आई मागे जा ऽ ऽ ऽ य ! ।। ध्रु ।।

गाय व्याली ,
तिला वासरू झालं ,
देऊ सर्वांना पेढे,
गोठ्यामध्ये जाऊ ,
वासराला पाहू,
म्हणून झाले सारे वेडे . . .हा ! ।। १ ।।

गोठ्यामध्ये ऽ ऽ,
पाहीले त्यांनी,
वासराला ऽ ऽ आणखी निरखून ऽ ऽ ,
मग दिसला ,
त्यांना टिळा ,
जो होता त्याला ऽ ऽ जन्मापासून ऽ ऽ ऽ ।। २ ।।

अरे ,हा तर चमत्कार !
आहे हा दैवी अवतार ,
आहे हा ऽ ‍ऽ दैवी ऽ ऽ अवतार ।। ३ ।।

वासराचा नंदी केला , तुरूरू ,तुरूरू,
त्याला त्यांनी देव बनवला,
एकतरी जीव आ ऽ ऽ ता फटक्यांपासून वाचला ।। ४ ।।

पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

No comments: