Saturday, February 23, 2008

वीकली ऑफ( बिडंबन कविता)

आमची ही कविता अश्या एका छोटयाशा जीवाला समर्पित आहे ,ज्याच्याकडे आजपर्यंत फार कमी साहीत्यीकांचं लक्ष गेलं आहे.

चाल: दूध दूध दूध दूध पियो ग्लास फ़ुल दूध !

ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,
गादीखालून निघाला ढेकूण ॥ध्रु॥
पहाटे उठायचे उदया म्हणून ,
झोपायला तुम्ही , लवकर जाता,
पण त्याला नाही माहीत तुमचे शेड्यूल ,
दोघांमुळे होते गादी हाऊसफुल्ल !
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,गादीखालून निघाला ढेकूण ॥१॥

पाहूनी व्यवस्था ठिक एकूण ,
अंग दिले तुम्ही टाकून ,
झोपलेल्या तुम्हाला हा पहातो
पटकन मग चावायला निघतो.
खूप घोर जीवाला लावतो हा ढेकूण !
ढेकूण sss ! ढेकूण sss ! ॥२॥

ढेकूण म्हणतो असेच नेहमी होते,
काळ वेळ काही यांना नसते,
जिथे तिथे असते यांची सुप्रीमसी ,
मिळत नाही मला प्रायव्हसी.
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण
गादीखालून निघाला ढेकूण ! ॥३॥

तुम्ही झोपलायत मजेत बिनघोर,
ढेकूण झालाय खूपच बोअर,
हवंय त्याला काहीतरी अमेझींग,
सुरू करतो मग तो बाईटींग .
त्रास सर्वांना खूप देतो हा ढेकूण !
ढेकूण sss ! ढेकूण sss ! ॥४॥

उठून मग तुम्ही जागे होता ,
काय होते ते ,शोधायला लागता,
कानाकोपऱ्यांत कुठे तरी ,लपलेला असतो हा शोधून कपारी .
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,
गादीखालून निघाला ढेकूण ! ॥५॥

शोधूनी याला आठवडाभर ,
वैतागता तुम्ही खूप अखेर ,
सनडे नाइट ला आरामात पहूडता ,
सकाळपर्यंत चांगलेच घोरता,
ढेकूण ढेकूण ढेकूण ढेकूण ,
गादीखालून निघाला ढेकूण ! ॥६॥

चावला नाही नेहमी सारखा,
म्हणून होतो तुमचा मूड ऑफ ,
तेव्हा हा म्हणत असतो , महाशय बरंका ,
आमचाही असतो एक विकली ऑफ ! ॥७॥



पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: www.hasyaparag.blogspot.com

No comments: