Saturday, February 23, 2008

’तृप्ती’(हास्य विडंबन)

एक पती दिवस भराच्या श्रमानंतर थकून आला .त्याला खुप भूक लागलेली होती.आधी श्रावण नंतर पितृपक्ष असे जवळजवळ दोन महिने त्याला नॉन व्हेज मिळाले नव्हते.पत्नि टि.व्हीवर शाहरुखचा सिनेमा पहात होती.त्याने आपल्या भावना गाण्यांत व्यक्त केल्या.

(चाल: बाजीगर ओ बाजीगर )

तो: भाजी कर गं भाजी कर ss
मटनाची आज भाजी कर ॥ धॄ ॥
हो ss किती झालेत दिवस ,
आता सांग थांबू कसं ?
आता बस झाला हा शाकाहार ss !
भाजी कर गं भाजी कर , मटनाची आज भाजी कर ॥ १ ॥
पालक , बटाटा अन मेथी,
शेपू ,वाटाणा अन चवळी,
खाऊन रोज रोज तेच ,
चव तोंडाची गेलीय सगळी ॥२॥
ती: आले माझ्या ध्यानात ,
आत्ताच जा तुम्ही बाजारात,
आणा मटन चांगले तीन शेर,
तो: भाजी कर गं भाजी कर ,
मटनाची आज भाजी कर ॥ ३ ॥
(तेवढ यांत तिच्या लक्षात आले की किराणा संपलेला आहे.)
ती: नाही खोबरं ,तेजपानं ss,
मसाला ही आज संपलायनं ,
लोडशेडींग मुळे घोळ ss,
बेत झालाय अवघड
तो: होss .तसाच मॉलमध्ये जातो
तयार मसाला आणतो
मग तर तू पावसील की नाही ss?
स्वयंपाक कर्शील की नाही ?
ती:आत्ता बोललास तसा तू जर वागणार
तयार मसाला मला मिळणार
तर छान भाजी मी बनवणार

आत्ता जारे तू झटपट ,
मसाला आणून दे पटपट !

No comments: