Saturday, February 23, 2008

‘गारवा’ नॉन व्हेज'(हास्य विडंबन)

चाल: ‘गारवा’ या गीतसंग्रहाचे निवेदन.
रविवारी सकाळी पिशवी,
घेऊन बाहेर पड,
गाडी काढू नकोस,
मंथ एंड आहे.
नसेलच पेट्रोल त्यांत,
बाजारांत कोपऱ्यातल्या दुकानाजवळ जा.
पाटी दिसेल तुला-“खुश रहो मटन शॉप”
दुकानात जाऊन ऊभी रहा.
ऊभी रहा उगाच!
बघ! एखादा कोवळा बोकड दिसतोय का?
मग विकत घे मटन.
उरलेले चार रुपये घ्यायला विसरू नकोस.

घरी ये.
त्यांत टाक ते मटन ,
आणि ढवळ,
ढवळत बस उगाच,
बघ! माझी आठवण येत्येय का?
मग चालू कर गॅस ,
बघत बस त्यांकडे ,
कुकरच्या आंतमध्ये शिजत असलेल्या मटनाची संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न कर.
एक स्सस्सस्सस्स स्स्य स्स्य स्स्य!
दोनस्सस्सस्सस्स स्स्य स्स्य स्स्य!
बघ ! तिसरी शिट्टी होत्येय का?
आता कढई घे .
त्यांत मसाला टाक .
तेलही ओत त्यांत,
मग मटन टाक,
भात पोळ्या सॅलड कोशिंबीर केली असशीलच!
आता ताट वाढून घे ,
रिमोट घे टीव्ही लाव.
जगजीत गझल गात असेल,
तू बंद कर.
डिव्हीडीवर आपका सुरूर लाव.
बघ ! माझी आठवण येत्येय का ?
आता जेवायला बस.
भाजीत नेहमीप्रमाणे मीठ नसेलच!
तू ते टाक.

नंतर, ताटात वाढून घेतलेला लांबलचक लेगपीस उचल.
त्यांतलं खाण्यालायक सगळं मटेरिअल संपव.
मग बघ एकटक…
बघ त्या स्वनिर्मीत दुर्बीणीतून,
पलीकडे … आरपार…
बघ काही दिसत्येय का?
बघ काही दिसत्येय का?
बघ काही दिसत्येय का?

पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

3 comments:

Unknown said...

Hi
Good vidamban
Can I put it on my blog aggreagator
www.majhablog.inn
Hope u dont mind

Unknown said...

namaskar,phar chhan 'garava'ahe.nidan ya nimittane mutton banvayla tari shikalo....dhanyawad

parag khairnar said...

Thank You!