Saturday, February 23, 2008

मनातल्या मनांत !

ऎश्वर्या - अभिषेक च्या लग्नाचा सर्व फिल्मी पाहुण्यांनी आनंद लुटला .
त्यांच्या मनातले विचार आम्हाला आमच्या माइंड रिडर या यंत्रामुळे कळाले.

ऎश्वर्या: तपश्चर्या माझी आज आली फळाला,
मंगळ असून ही कुंडलीत , अभि लागला गं बाई गळाला !

सलमान : शायनींगमध्ये तुझ्या बरोबर ,मी केला ’हम दिल दे चुके सनम ’
पण पदरी आली तनहाई ,जेव्हा करायला गेलो तुला बेगम !

अभिषेक : बीग बी चा स्मार्ट मुलगा ,आज हिट ठरला ,
’ Ash’शी बांधून लग्नं बंधन ,सलमानचा बरोब्बर पत्ता काटला .

ना प्रिती,ना प्रियंका,ना राणी ,ना दिया,
the whole thing is that के भैया सबसे बडा रूपैया

(तिथे रेखा ही होती,सगळा लग्नाचा माहोल पाहून तिला आपले जुने दिवस आठवले )
रेखा : कुणी चांदी घ्या गं, कुणी सोनं ही घ्या,
मला बाई बदल्यांत माझा अमीत गं द्या.

हेमामालीनी: ’धूम’ अन ’दस’ मध्ये बरोबर असूनही ,
जमलं नै आमच्या ईशाला काही,
हिनं (Ash नं)मेलीनं काय केलं गारूड जाणे ,
होत्येय माझी लाही लाही .

(अमरसिंगही जातीनं हजर होते.)
अमरसिंग : कोणी आपल्याला काही म्हणावे ,घेऊ एकेकाची खबर ,
अमितजींना कोणत्याही संकटातून सांभाळायला ,
मातब्बर आहे हा त्यांचा गॉडफ़ादर !

(एवढ्यांत ऎशच्या मनांत पुन्हा काही तरी आलं .)
ऎश: किती सांगू मी सांगू कुणाला SS,
किती कुतबे करून अभी हा मिळाला SS. (कुतबे = बरे -वाईट श्रम)

अमिताभ :मुलगा अभिनयांत कसाही असला ,
तरी मी त्याचा बाप डोकं लढवितो,
पिक्चर नाही चालले तर काय झालं ,
लग्नं शूट करून पैसे कमवितो .

जया: हे काली माते ! नव्या बहूच्या रूपानं आमच्या घरात लक्ष्मी येऊ दे .
दोन चार तरी फ़िल्मे, माझ्या अभीच्या नावानं लगोलग हिट होऊन जाऊ दे.

(पत्रकारांना अमितजींनी शेवटपर्यंत काही आंत येऊ दिलं नाही.)
पत्रकार: अमितजी , अहो उद्या वाटल्यांस सगळे awards अभिला मिळाले असं खोटंच छापून घ्या,
पण आजच्या दिवशी मात्र कृपा करून ,आत येवून , थोडे फ़ोटो काढू द्या.

निर्माते: सरकार ,बंटी - बबली मुळे केली बाप-बेटयांची भरपूर लोकप्रियता एनकॅश,
आत्ता तर मिळाली फ़्री मध्ये बायको अभीची , ही विश्वसुंदरी Ash !

दिग्दर्शक: सगळे सुटलेत या जोडी मागे ,आम्हा काही सुचेना ,
करावा तयार एखादा मेगा शो ,घेऊन ही राघू-मैना !

(याप्रसंगी समिक्षकांना रसगुल्ले दिले गेले.म्हणून ते खुश होते.)
समिक्षक: पो-या जरी करतो कधीकधी बापाची सेम टू सेम कॉपी ,
चांगलं होतंय ना अभी - ऎशचं मग आम्ही वेरी वेरी हॅप्पी!

(बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची खूप धांदल उडाली.)
पोलिस : कोणाचं लग्नं अन कोणाचं डोहाळजेवण, कुठे मारामारी अन कुठे कापाकापी,
ऎन समारंभात नशीबी येई दरबानासारखं दारात उभं रहाणं ,कुठे पडलॊ कमी तर होते गळचेपी !

(इथे भूतांनीही हजेरी लावली होती).
परवीन बाबीचे भूत:सर्वात आधी मी अमितला पटवला ,
नंतर कसा कोण जाणे जयानं त्याला गटवला ,
संतापाच्या अतिरेकानं वेड लागून जीव मी गमावला,
बदला असा घेईन की कमी पडेल भुई ही पळायला !

(तिथे अनेक सिने तारका हजर होत्या)
बिपाशा:सब की बाराते आई ,डोली तू भी लाना,दुल्हन बनाके हमको जॉनजी ले जाना .

( याप्रसंगी सैफ़ - करीना एका बाजूला अन शाहीद दुसऱ्या बाजूला असे बघण्यांत आले.)
करीना: देखा जबसे सैफ़को , बस देखा सैफ़को यारा,
सैफ़से कोई अच्छा है , ना सैफ़ से कोई प्यारा,
यू नजरे ना फ़ेरो तुम मेरे हो सैफ़ तुम,
कह दिया ,कह दिया , यू आर माय सोनिया.

शाहीद:आधीच झाली होती हिच्यामुळे माझी खुप बदनामी,
कुठून पाठवली त्यांत उपरवाल्यानं ,सैफ़ नावची त्सुनामी.

(शाहीदची अवस्था पाहून सैफ़ला आतून उकळ्या फ़ुटत होत्या.)
सैफ़: लोकंहो ! सांभाळा ! मी आहे दुसऱ्यांच्या गर्लफ़्रेंड पळ्वणारा, मी आहे आशीक, आशीक आवारा !

(शाहरुखनं या महोत्सवापासून दूर राहणं पसंत केलं)
शाहरुख: या अल्लाह ! रहम करना ! या बिग बी चे सगळे हिट चित्रपट ,मुझे फ़िरसे करने का मौक देना.

(तिथे श्रीदेवीही आली होती.)
श्रीदेवी:चालेनात पिक्चर माझे अनिलबरोबर,शेवटी खुप खाल्ल्या खस्ता,
केलं लग्नं शेवटी बोनीशी,हाच होता आखरी रास्ता.

अनिल: ए भाईलोग सुनॊ ! श्रीदेवीला फ़सवलं नाही मी,तिचा आहे आपल्यावर विश्वास ,
आपल्या पोरीनेपण एंट्री मारली’ सांवरीया’तून,लाईफ़ चाललीय झकास !

(खासदार जयाप्रदा ही तिथे होत्या)
जयाप्रदा:हमको ईथना तो कुछ हिंदी नै आता ,लेकीन हम ईथना कैता,
शुक्रियादा कर्ताय इंडीयन पब्लिक का ,जो हम जैसा कलाकार को चुनाव में जिताता !

ऋतिक:कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात मी,आपण बरं की आपलं काम बरं,
लवकरच येतोय माझा Ash बरोबर ,जोधा आणि अकबर !

( ’क’ मालीकांची निर्माती एकता ही तिथे होती)
एकता:सुरूवात झाली अमितजींच्या KBC मुळे,माझा गल्ला भरायला बरंका !
प्रक्षेपणात लग्नाच्या या ,वेळ मिळवून ,दाखवू का ’क’ची एखादी मालीका ?

(सगळे आले ,मग मी का नको म्हणून सानियाही तिथे आली होती.)
सानिया:चार डाव खेळू बाई,तेव्हा एखादा तरी जिंकावा,
अभीसारखा मलाही पाठव , इंश अलाह ,एक रापचीक छावा !
(अशाप्रकारे हे लग्नं संपन्न झाले)





पराग खैरनार,नाशिक
.parag_vk111@yahoo.co.in
paragkhairnar@gmail.com
visit my site: http://www.hasyaparag.blogspot.com/

No comments: